Just another WordPress site

बस वेगाने धावत असताना चालकाला आलेल्या हार्टअटॅकमुळे बस व कर यांच्यातील भीषण अपघात ९ ठार,२८ जखमी

गुजरात-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे.बसने कारला दिलेल्या धडकेत नऊ प्रवासी ठार झाले असून २८ जण जखमी झाले आहेत.प्रवाशांनी भरलेली बस सूरतमधील प्रमुख स्वामी महाराज शताब्दी महोत्सव कार्यक्रमातून परतत होती.यावेळी नवसारी राष्ट्रीय महामार्गावर बसने कारला धडक दिली.चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.चालकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण त्याचा मृत्यू झाला आहे.

या भीषण अपघातात कारमधील नऊ प्रवाशांपैकी आठजणांचा मृत्यू झाला असून बसमधील २८ जण जखमी झाले आहेत.११ जणांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.ही बस सूरत येथून वलसाडला चालली होती.कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला होती अशी माहिती नवसारीचे पोलीस अधिक्षक ऋषीकेश उपाध्याय यांनी दिली आहे.कारमधील सर्व प्रवासी गुजरातच्या अंकलेश्वर येथील आहेत.ते सर्वजण वलसाड येथून आपल्या घरी निघाले होते.अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती.पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने बस बाजूला करत वाहतूक सुरळीत केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.