Just another WordPress site

कर्जफेडीच्या तडपणाखाली वृद्ध शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

बुलडाणा-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
नापिकीमुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता आणि वाढता कर्जाचा डोंगर यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकरी दाम्पत्याने शुक्रवारी विष प्राशन करून आत्महत्या केली.वसंत डामरे (७०)आणि सरला डामरे (६५) असे या दाम्पत्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,नांदुरा तालुक्यातील बेलुरा येथील डामरे कुटुंबाकडे दोन एकर जमीन आहे.शेतीतून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे डामरे कुटुंबाला दिवसेंदिवस अवघड होत चालले होते.त्यात कर्जाची परतफेड कशी करणार याची चिंताही त्यांना सतावत होती याच चिंतेतून डामरे दाम्पत्याने जहाल विष प्राशन केले त्यात दोघांचाही मृत्यू झाला.याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.शेतीची जोखीम कमी करू,शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्न साधने निर्माण करू,शेतीपूरक व्यवसायासाठी कर्ज देऊ,शेतकऱ्यांना मिळकतीची साधने उपलब्ध करू अशा घोषणा सरकारकडून सतत केल्या जात असल्या तरी वास्तव यापेक्षा अगदी उलट असल्याचे चित्र आहे.कर्जफेडीच्या तडपणाखालीच या दाम्पत्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा परिसरात चर्चिली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.