“आपल्याविरोधात रचण्यात आलेल्या कटात पक्षातील नेता सहभागी असू शकतो”
अब्दुल सत्तार यांच्या दाव्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याची चर्चा
मुख्यमंत्र्यांच्या घऱात झालेल्या चर्चेतील गोष्टी बाहेर येत असल्याने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाराजी जाहीर केली आहे.यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली असून चौकशीची मागणीही केली आहे.इतकेच नाही तर आपल्याविरोधात रचण्यात आलेल्या कटात पक्षातील नेता सहभागी असू शकतो असे सूचक विधानही त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केले आहे.अब्दुल सत्तार यांच्या या दाव्यामुळे शिंदे गटात अंतर्गत कुरघोडी सुरु असल्याची चर्चा रंगली आहे.मी एक छोटा कार्यकर्ता आहे मात्र यांनी संपूर्ण महाराष्ट्राला गिळले असून यांच्या चौकशा झाल्या तर भुई पळता थोडी होईल असे अब्दुल सत्तार विरोधकांना उद्धेशून म्हणाले.मुख्यमंत्र्यांकडे सर्वांचा डेटा जमा आहे.मुख्यमंत्री सभागृहात बोलले आहेत.मी तर आधीच टीईटीमध्ये एका कागदाचाही फायदा घेतला असेल तर फासावर लटकवा म्हटले आहे.जोपर्यंत देव माझ्यासह आहे तोपर्यंत काही होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.