Just another WordPress site

कोरोगाव भीमा येथे आज २०५ वा शौर्य दिन……

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 

आज नवीन वर्षाची सुरुवात सर्वंत्र होत असताना,नवीन संकल्पसुद्धा करण्यात येत आहेत,तर अनेकजण नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शानाने करत आहेत,तर दुसरीकडे कोरोगाव भीमा याठिकाणी आज २०५ वा शौर्य दिन साजरा करण्यात येत आहे.शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लाखो नागरिकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली आहे.कोरेगाव येथे १ जानेवारी
१८१८ मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली.ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती.महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाई विरुद्ध युद्ध पुकारले होते.हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ बांधण्यात आला.दरवर्षी कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभ शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होतो.आज राज्यभरातून लाखो आंबेडकर अनुयायी या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.तर दुसरीकडे याठिकाणी येथे विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनेक राजकीय नेते येतात.राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार,मंत्री चंद्रकांत पाटील,प्रकाश आंबेडकर केंद्रीयमंत्री रामदास आठवले,आमदार जितेंद्र आव्हाड आदी नेतेही कोरेगाव भीमा याठिकाणी येणार आहेत.महार सैनिकांच्या सन्मानार्थ येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला महाराष्ट्रसह देशभरातून आंबेडकर अनुयायी यांच्या सह इतरही लाखोंच्या संख्येने लोक याठिकाणी येतात.१ जानेवारी १९२७ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला.तेव्हापासून याठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
दरम्यान बंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत.यंदाच्या शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा परिसरात म्हणजेच शिक्रापूर आणि लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या कालावधीत मद्य विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.याकाळात परिसरातील सर्व मद्य दुकाने पूणर्तः बंद राहणार
आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.