यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील पाडळसा उपसरपंचपदी हेमलता राजेंद्र बऱ्हाटे यांची बिनविरोध निवड लोकनियुक्त सरपंच गुणवंती सूरज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली.निवडणुकीचे कामकाज ग्रामविकास अधिकारी सी एच वाघमारे यांनी पार पाडले. यावेळी सर्व १५ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.उपसरपंच पद महिलेला मिळाला पाहिजे यासाठी ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य अरुण नेमचंद चौधरी,प्रकाश चिंतामण पाटील यांनी पुढाकार घेतला होता.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य उज्वला रवींद्र पाटील,सुदेश कडू बाविस्कर,अवंतिका मनीष नेहेते,रुपाली मनोज पाटील (बिनविरोध),हेमलता राजेंद्र बह्राटे,अरुण नेमचंद चौधरी,प्रकाश चिंतामण पाटील,तुषार रामचंद्र भोई,कविता संजय कोळी,पांडुरंग शामराव कोळी,नामदेव कडू कोळी,अलका रघुनाथ सोनवणे,किरण प्रभाकर तायडे,सुरेखा सीताराम कोळी,पल्लवी प्रकाश तायडे,नवनियुक्त सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचे भोरगाव लेवापाटीदार युवा अध्यक्ष ललित कुमार पाटील,ग्रामीण शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ.उदय चौधरी,माजी सरपंच ज्ञानेश्वर तायडे,माजी प्रभारी सरपंच रजनीकांत पाटील,जयंत पाटील,अँड.सुरज पाटील,सुधीर भोलाणे,विजय पाटील,पोलीस पाटील सुरेश खैरनार,सिताराम कोळी,शेखर तायडे यांची उपस्थिती होती.प्रसंगी नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे अभिनंदन करण्यात आले.