यावल-पोलिस नायक(प्रतिनिधी):-
येथील महाविद्यालयीन विद्यार्थीनीचा पाठलाग करून छेडछाळ करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला यावल बसस्थानकाच्या आवारातून ताब्यात घेण्यात आले आहे.याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सदरील संशयित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,यावल तालुक्यातील मनवेल येथील काही विद्यार्थ्यानी यावल महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असतात.यावल बसस्थानक येथून सर्व विद्यार्थीनी मनवेल येथे बसने जाण्यासाठी येत असतात.दरम्यान आज दि.५ रोजी बसस्थानक आवारातील पानटपरीजवळ अशोक नानकराम दुधानी रा.भुसावळ हा चहा विक्रेता उभा राहून मनवेल येथील विद्यार्थीनीकडे एक टक पाहत होता याकडे विद्यार्थीनींनी दुर्लक्ष केले.मुली बसमध्ये बसल्यानंतर या चहा विक्रेत्याने यावेळी दुचाकीने बसचा पाठलाग केल्याचे गावातील एका विद्यार्थीनीच्या लक्षात आले.याबाबत सदरील चहा विक्रेत्याने गावातील काही तरूणांकडे महाविद्यालयीन विद्यार्थीनींचा मोबाईल नंबर देखील मिळविण्याचा प्रयत्न केला.सदरील प्रकार लक्षात आल्यानंतर विद्यार्थीनींनी सकाळी १० वाजता यावल बसस्थानक येथे आल्यानंतर त्याला जाब विचारला.यावेळी जास्त मुलांचा घोळका पाहून त्यांने सदर मुलींची माफी मागितली मात्र या मुलींनी त्यास नागरीकांच्या मदतीने यावल पोलीसांच्या ताब्यात दिले.याप्रकरणी संशयित आरोपी अशोक नानकराम दुधानी रा.भुसावळ यांच्या विरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक प्रदीप बोरूळे करीत आहे.