मुंबई-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीच्या पदाधिकार्यांची बैठक दि.७ जानेवारी रोजी दादर,मुंबई येथे आमदार कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठया उत्साहात संपन्न झाली.राज्याध्यक्ष नवनाथ गेंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्यकार्यकारणी पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष,जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदरील बैठकीत राज्यकार्यकारणी पदाधिकारी,विभागीय अध्यक्ष,जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष यांनी सहभाग घेत विविध प्रश्न मांडले.यावेळी वस्तीशाळा शिक्षकांचा प्रश्न,जुनी पेन्शन योजना,डिसीपीस/एनपीएस रक्कम हिशोब,मुख्यालयी राहणे,बदली प्रक्रिया,अनियमित वेतन,पदवीधर शिक्षकांचा प्रश्न,अशैक्षणिक कामे,वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी,सातवा वेतन आयोग उर्वरित हफ्ते यासह राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.तर येणार्या काळामध्ये हे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती कटिबद्ध असल्याचे नवनाथ गेंड यांनी संगितले.
प्रसंगी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात शिक्षक बॅंक,शिक्षक पतसंस्थेमधील संचालकपदी निवड झालेल्या शिक्षक भारती शिलेदारांचे आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आले.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीचे दुसरे राज्यव्यापी अधिवेशन फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले.सदर सभेस जळगाव जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील,जिल्हाउपाध्यक्ष प्रविण पाटील,चाळीसगाव तालुकाध्यक्ष विकास घुले,दिपक पाटील,अमळनेर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील,धरणगाव उपाध्यक्ष रविंद्र पाटील,एरंडोल संघटक शरीफ शेख,पारोळा संघटक प्रविण पाटील यांच्यासह राज्यभरातील राज्यकार्यकारणी पदाधिकारी,विभागीय अध्यक्ष,जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.