Just another WordPress site

यावल नॅशनल एज्यु.सोसायटीची सर्वसाधारण सभा गोंधळात संपन्न

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

येथील नॅशनल एज्युकेशन सोसासटीची अध्यक्ष व त्यांच्या संचालक मंडळाची सर्वसाधारण सभा अखेर अनेक वर्षानंतर गोंधळाच्या वातावरणात संपन्न झाली.या सभेत विविध ५ विषयांवर चर्चा करण्यात आली व सदरील विषय सत्तेच्या बळावर मंजुर देखील करण्यात आली.यावेळी अध्यक्ष व संचालक मंडळाने शिक्षक भरती व विविध कामात आर्थिक घोळ व भ्रष्ठाचार केल्याबाबत बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्यात आल्याचा आरोप सदस्यांनी केला.

याबाबत अधिक वृत्त असे की,यावल येथील नॅशनल एज्युकेशन सोसायटीची सर्वसाधारण सभा डॉ.झाकीर हुसैन ऊर्दू हायस्कुल नुतन आयटीआय सभागृहात संस्थेचे अध्यक्ष मोहम्मद ताहेर शेख चाँद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सर्वसाधारण सभेत विविध विषयांच्या विरोधाला न जुमानता मंजुरी देखील देण्यात आली.संस्थेच्या घटनावलीनुसार प्रतिवर्षी सर्वसाधारण सभा घेणे व तिन वर्षानंतर संचालक मंडळाची निवडणुक घेणे बंधनकारक असतांना देखील तब्बल सात वर्षानंतर घेण्यात आलेली सर्वसाधारण ही बेकायद्याशीर असुन संस्थेचे अध्यक्ष व त्यांचे सर्व संचालक मंडळ हे पुर्णपणे नियमाबाह्य कार्य करीत असल्याचा आरोप संस्थेच्या आजीवन सदस्यांच्या वतीने करण्यात आला आहे.यावेळी संस्थेची घटना नियमावली बदलण्यास देखील सदस्यांनी तिव्र विरोध दर्शविला.संस्थेचे अध्यक्ष व त्यांचे संचालक मंडळ सत्तेच्या बळाचा गैरवापर करीत असुन ते बेकायद्याशीर असल्याचा आरोप सदस्यांनी सभेत केला.

या सर्वसाधारण वार्षीक सभेला अध्यक्ष मो.ताहेर शेख चाँद,संस्थेचे माजी अध्यक्ष व संचालक शब्बीर खान मोहम्मद खान,ईब्राहीम शेख चाँद,ईकबाल खान नसिर खान,अत्ताउल्ला खान सुलेमानी,मुस्तफा खा सुब्हान खा,गुलाम रसुल गुलाम दस्तगीर,अय्युब खान हमीद खान, याकुब शेख चांद,अजीज खान हमीद खान यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.प्रसंगी अध्यक्ष व संचालक मंडळाच्या आर्थिक मोहापाई  बेकायद्याशीर शिक्षकांच्या नेमणुकीमुळे विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा खालवला असल्याची खंत यावेळी अनेक जेष्ठ सदस्यांनी “पोलीस नायक”सोबत बोलतांना व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.