यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील एसएनडीटी महिला महाविद्यालयच्या एनएसएस अंतर्गत श्रीक्षेत्र डोंगरदा येथे हिवाळी शिबिराला काल दि.११ पासून सुरुवात करण्यात आली आहे.या शिबिराच्या विविध उपक्रमांतर्गत आज दि.१२ जानेवारी रोजी पेस गृप पुणे संचलित अवंता फाउंडेशन चहार्डी तालुका चोपडा यांच्या वतीने यावल तालुका समन्वयक अशोक तायडे यांनी व्यसनमुक्ती अभियान संदर्भात चर्चसत्रात भाग घेऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.
प्रसंगी या व्यसनमुक्ती चर्चासत्रात यावल तालुका समन्वयक अशोक तायडे यांनी व्यसनमुक्ती अभियान संदर्भात तसेच व्यसनाबाबत सखोल अशी माहिती दिली.त्याचबरोबर व्यसनापासून होणारे मानसिक,आर्थिक,शारीरिक नुकसान याबद्दल मुलींना अतिशय सोप्या पद्धतीने माहिती दिली.तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी.जी.भोळे यांनी घुटखा,तंबाखू,दारू तसेच इतर नशीली अंमली पदार्थांपासून होणारे आजार तसेच त्यापासून मानवी शरीराला होणारा धोका याबाबत मार्गदर्शन केले.प्रसंगी पेस गृप पुणे संचलित अवंता फाउंडेशन चहार्डी तालुका चोपडा यांच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या व्यसनमुक्ती अभियाना बद्दल प्राचार्य डी.जी.भोळे यांनी कौतुक केले.सदरील कार्यक्रमाला एनएसएस कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक बी.आर.पाटील,डॉ.शकुंतला भारंबे,प्रा.विजय वाकेकर,प्रा.डी.एस.कुरकुरे,मुख्य लिपिक कल्याण पाटील,शिपाई ललित पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.बी.आर.पाटील यांनी केले तर आभार डॉ.शकुंतला भारंबे यांनी मानले.