उद्यापासून मुंबईत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्याकरिता मिळणार वातानुकूलित बस सेवा
बेस्टच्या चलो ऍप द्वारे प्रवाशांना घेता येणार लाभ
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-मुंबईत विमानाने इच्छित स्थळी येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांना ९ सप्टेंबर २२ पासून आता वातानुकूलित बस सेवेचा लाभ मिळणार आहे.प्रवाशांना या बसचे आगाऊ तिकीट काढून आसन आरक्षित करता येणार असून आरामदायी व वातानुकूलित प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.मात्र याकरिता प्रवाशांना बेस्टच्या ‘चलो ऍप ‘द्वारे या बसेसचा लाभ घेता येणार आहे अशी माहिती बेस्टच्या वतीने देण्यात आली आहे.
या सेवेचा लाभ ९ सप्टेंबर २२ पासून विमान प्रवाशांव्यतिरिक्त अन्य प्रवाशांना घेता येणार आहे.सध्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून (टी२) दक्षिण मुंबई बॅकबे करीत बसक्रमांक ८८१,छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून (टी२) जलवायू विहार वाशी खारघर करीत बस क्रमांक ८८२ व छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळापासून (टी२) कॅडबरी जंक्शन ठाण्याकरिता बस क्रमांक ८८४ अशा या तीन विजेवर चालणाऱ्या वातानुकूलित बसेस प्रवाशांच्या सेवेकरिता सुरु करण्यात आल्या आहेत.या बसचे ‘चलो ऍप ‘च्या माध्यमातून घर बसल्या पाहिजे तशी माहिती भरून आरक्षण करता येणार आहे.व त्याकरिता चलो ऍप डाउनलोड करून लाभ घ्यायचा आहे.प्रवाशांना आपल्या सवडीनुसार पर्याय यात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.असे बेस्टच्या वतीने कळविण्यात आले आहे.