यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील पाडळसा येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत रब्बी शेतकरी मेळाव्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले.यावेळी शेतकऱ्यांच्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यादरम्यान दोन महिन्यांपासून सदरील विद्यार्थ्यांनी पाडळसा गावांमध्ये उपस्थित राहून विविध प्रकारच्या शेती संबंधीत प्रात्यक्षिक करून दाखवली तसेच शेतकऱ्यांनी शेती पिकवतांना त्यांनी केलेले प्रयोग सुद्धा अभ्यासले.या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी तसेच शासनाच्या नवीन योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत याकरिता या विद्यार्थ्यांनी गहू,हरभरा,केळी,ऊस या पिकांवर आधारित रब्बी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन यावल तालुका कृषी अधिकारी सागर सिनारे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाडळसा विकास सोसायटी चेअरमन अनिल चौधरी हे होते तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगावचे प्रा.निलेश सरदार यांनी शेतकऱ्यांना शेती विषयावर आधारित मार्गदर्शन केले व बदलत्या जीवनशैलीचा तसेच शेतीसाठी उपयोगी असणाऱ्या रासायनिक घटकांमुळे मानवी जीवनावर त्यांचा कसा परिणाम होतो यावर शेतकऱ्यांना माहिती पटवून दिली.तसेच माजी सरपंच ज्ञानेश्वर तायडे यांनी देखील शेती विषयासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी पाडळसा ग्रामसेवक छत्रपाल वाघमारे,पोलीस पाटील सुरेश खैरनार,राजेंद्र झोपे,चेतन पाटील,राजेश पाटील,ललित बऱ्हाटे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन कृषीदूत पाडळसे आकाश वाघ,कुणाल पाटील,आकाश यादव,विकास बारेला,गोपाल रेड्डी,धनेश कुमार यांनी केले तसेच चिखली बुद्रुक,खुर्द व म्हैसवाडी येथील कृषी दूतांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल पाटील यांनी केले तर आभार आकाश यादव यांनी मानले.