Just another WordPress site

फैजपुर पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पाटलांचा गौरव

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील फैजपुर पोलीस स्टेशन येथे वार्षिक तपासणी अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कृणाल सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस पाटलांच्या सभेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी  घेण्यात आली. यावेळी मागील वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस पाटलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की,फैजपुर पोलीस स्टेशन येथे आज दि.१९ रोजी वार्षिक तपासणी अंतर्गत पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले.सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कृणाल सोनवणे हे होते.यावेळी गाव निहाय माहिती घेऊन पोलीस पाटील यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.यामध्ये प्रत्येक गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे,शेतीमालाच्या होणाऱ्या चोरी, गावात फिरणारे फिरते विक्रेते व अनोळखी इसम इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.तसेच मागील वर्षभरात चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या पोलीस पाटलांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यामध्ये सुरेश खैरनार पाडळसे,नरेश मासोळे मारूळ,तुषार चौधरी आमोदे, रवींद्र साळवे चिखली,हरीश चौधरी पिंपरूड,सौ.प्रफुल्ला चौधरी म्हैसवाडी यांना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कृणाल सोनवणे यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले.यावेळी फैजपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलिस अधिकारी सिद्धेश्वर आखेगावकर,पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे,पोलीस उपनिरीक्षक शेख साहेब,सहायक फौजदार हेमंत सांगळे,गोपनीय शाखेचे योगेश दुसाने यांच्यासह संपूर्ण फैजपूर पोलीस स्टाफ व फैजपूर पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.