Just another WordPress site

चितोडा येथे मोकाट माकडांचा मुक्त संचार;सरपंच यांचे वनविभागाला पत्र

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील चितोडा येथे माकडांचा मुक्त संचार वाढल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.माकडांच्या या नुकसानीबाबत व त्रासांमुळे नागरिक कमालीचे धास्तावलेले आहे.सदरील माकडांच्या मुक्तसंचाराबाबत व त्याच्या नुकसानबाबतची माहिती तसेच मोकाट माकडांचा त्वरीत बंदोबस्त व्हावा या संदर्भात लिखित निवेदन चितोडा सरपंच यांच्या वतीने नुकतेच देण्यात आलेले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील चितोडा या गावात मागील एक महिन्यांपासून सातपुडा या जंगलातून आलेल्या माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.माकडांच्या हौदोसामुळे व त्यांच्या मुक्त संचारामुळे गावातील ग्रामस्थ कमालीचे धास्तावले आहेत.तसेच तालुक्यातील अट्रावल येथे संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या श्री मुंजोबा महाराज यांच्या यात्रेला दि.३ सोमवार पासून सुरूवात होत आहे.चितोडा गावापासुन दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या अट्रावल गावातील यात्रेत जर ही माकडे शिरली किंवा चितोडा गावाकडुन अट्रावल यात्रेसाठी जाणाऱ्या मार्गावरील पादऱ्यांना किंवा दुचाकी वाहनाने देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठया त्रासाला सामोरे जावे लागु शकते अशा भितीपोटी माकडांच्या या टोळक्यांचा वेळीच बंदोबस्त व्हावा या संदर्भात चितोडा गावातील सरपंच अरुण देविदास पाटील व ग्रामसेवक पि.व्ही तळेले यांनी वन विभागाच्या पूर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांना पत्राद्वारे मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.