Just another WordPress site

यावल महाविद्यालयाच्या हिवाळी शिबिरात कोविड लसीकरण

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे हिवाळी श्रम संस्कार शिबिर दत्तक गाव चितोडा येथे राष्ट्रीय सेवा योजनाअंतर्गत समाजसेवेसाठी सक्रिय कार्यरत पाचव्या दिवशी कोविड लसीकरण अभियान राबविण्यात आले.सदरील कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

यावेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.गणेश जाधव व प्रा.सुभाष कामडी यांच्यासह ४८ विद्यार्थ्यांनी व १८ ग्रामस्थ अशा एकूण ६६ जणांनी कोविड लसीकरण बूस्टर डोसाचा लाभ घेतला.याकरिता भालोद ग्रामीण रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसर डॉ.प्राजक्ता चव्हाण,चितोडा प्राथमिक उप आरोग्य केंद्र सहाय्यक डॉ.अर्चना पाचपोळ,यावल येथील एनजीओ यु.आर.जी. केअरचे धीरज भोळे यांनी प्रथम विद्यार्थ्यांना कोविड लसीकरण जाणीव जागृती याबद्दल समुपदेशीय मार्गदर्शन केले.यासाठी आरोग्य सहाय्यक नितीन जगताप,आरोग्य सेवक अल्ताफ देशपांडे,आरोग्य सेविका वैशाली महाजन,आशा सेविका तनुजा पाटील,कल्पना धांडे व मदतनीस सिंधुताई तायडे यांनी लसीकरण करून घेण्यासाठी सहकार्य केले.

तर दुपारच्या बौद्धिक सत्रात “युवकांचा ध्यास व ग्राम-शहर विकास” या विषयावर डॉ.नरेंद्र दिनकर महाले यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी डॉ. नरेंद्र महाले यांनी गाव व शहर या संदर्भात युवकांची भूमिका,युवक म्हणजे काय?युवक कसा असावा? युवकाने ग्रामीण व शहरी भागाच्या विकासासाठी कुठल्या प्रकारचे प्रयत्न करावेत ?त्यातून समाजाचा विकास कसा साधावा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.तसेच विविध  उदाहरणांचा दाखला देत विद्यार्थ्यांना नवनवीन समाज विकासाच्या योजना व उपक्रम यांची माहिती दिली.त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्वविकास साधून समाजविकासातून ग्रामीण भागाचा व सामाजिक विकास कसा करावा?याचे सखोल मार्गदर्शन केले.डॉ.महाले यांनी या कार्यक्रमात काही खेळ घेऊन त्यातून विद्यार्थ्यांना प्रेरित केले.फार अभ्यासपूर्ण व मनोरंजक पद्धतीने कार्यशाळा संपन्न झाली.कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.डी.पवार,सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एच.जी.भंगाळे,प्रा.भारती सोनवणे,प्रा.सुभाष कामडी,प्रा.गणेश जाधव, ह.भ.प.संचित कोळी महाराज यांची उपस्थिती होती.सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तेजस्विनी कोलते या होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी माळी हिने तर आभार दिपाली पाटील हिने मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी दशरथ पाटील,डिगंबर बारी,हर्षल सोनवणे,केशव काटकर, हृतिक बाउस्कर आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.