Just another WordPress site

चार वर्षापासुन बंद असलेली आडगाव जळगाव उंटावद मार्गे जाणारी बससेवा पूर्ववत सुरु

यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):-

तालुक्यातीत आडगाव येथे मागील ३० वर्षांपूर्वी सुरू असलेली आडगाव जळगाव उंटावद मार्गे जाणारी ही गेल्या चार वर्षांपासून बंद करण्यात आलेली होती.परंतु यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन दूरदृष्टिकोनातून व सहकार्याच्या भूमिकेतून आडगाव जळगाव उंटावद मार्गे जाणारी हि बस पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.सदरील बससेवा पुर्ववत सुरू झाल्याने परिसरातील विद्यार्थी पालकांसह ग्रामस्यामध्ये आनंद व्यक्त होत आहे.

जळगावहुन येणारी व आडगाव कासारखेडा,चिंचोली,उटांवद मार्गावर चालणारी बससेवा ही मागील चार वर्षांपासून बंद होती त्यामुळे आडगाव,कासारखेडा,चिंचोली व उंटावद येथील शिक्षणासाठी जळगाव येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह प्रवाशांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता.याबाबत उंटावद येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून यावल आगाराला बससेवा सुरू करावी याकरीता वेळोवेळी पाठपुरावा करून पत्रव्यवहारही केला जात होता मात्र नुकतेच यावल आगारात रूजु झालेले आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी उंटावद,चिंचोली,आडगाव व कासारखेडा येथील ग्रामस्थांच्या समस्या समजुन घेत शनिवार दि.२१ पासून ही बस सेवा पुन्हा सुरू केली आहे. चार वर्षानंतर सुरू झालेल्या या बस सेवेचे उंटावद येथे पुजन करून स्वागत करण्यात आले.यावेळी सरपंच छोटू भगवान भिल,विविध कार्येकारी सोसायटी चेअरमन शशीकांत गुलाबराव पाटील,ग्रामपंचायत सदस्य डीगंबर धना सपकाळे,दत्तात्रय ताराचंद पाटील,बस चालक व्ही.बी.साळुंके,वाहक व्ही.बी.पाटील,दिनकर देवराम पाटील,विकास विवेक पाटील,माधव गिरधर पाटील,समाधान त्रंबक पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.आडगाव जळगाव उंटावदमार्गे बससेवा सुरू झाल्यामुळे उंटावदसह आडगाव,कासारखेडा व चिंचोली येथील ग्रामस्थांनी यावल एसटी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांचे विशेष आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.