यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उद्या दि.२३ जानेवारीपासून “हात से हात जोड़ो” अभियानास सुरुवात होत असुन या अभियानाला यशस्वी करण्याकरीता पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कॉंग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे.
यावल तालुक्यात उद्या दि.२३ जानेवारी सोमवार पासुन सकाळी १०:३० वाजता येथील शेतकी संघात पक्ष ध्वजारोहण काँग्रेस कमेटी प्रदेश उपाध्यक्ष व रावेर यावल मतदार संघाचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांचे हस्ते तसेच प्रभाकर अप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली “हात से हात जोड़ो” अभियानाची सुरुवात केली जाणार आहे.या अभियानामध्ये प्रमुख उपस्थिती आमदार शिरीष चौधरी,माजी आ.रमेश चौधरी,हाजी शब्बीर खान,भगतसिंग पाटील,आर.जि.पाटील,नितीन चौधरी,लीलाधर चौधरी,शेखर पाटील,मारूळचे जावेद जनाब,धनंजय चौधरी इत्यादी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य,सरपंच,उपसरपंच,नगरसेवक,शहर काँग्रेस पदाधिकारी,तालुका काँग्रेस पदाधिकारी,अल्पसंख्याक काँग्रेस पदाधिकारी,एस.सी.विभाग पदाधिकारी,महिला काँग्रेस पदाधिकारी,सेवा दल पदाधिकारी,युवक काँग्रेस पदाधिकारी यांनी “हात से हात जोडो” अभियानामध्ये उपस्थित रहावे असे आवाहन यावल शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष कदीर खान व फैजपूर शहर कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष रियाज शेख यांनी केले आहे.