यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):-
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव व के.आर.कोतकर ज्युनियर कॉलेज चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १७ वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या.या स्पर्धेत किनगाव इंग्लिश मेडीयम स्कुलने विजय मिळवून घवघवीत यश मिळविले आहे.
दि.२० शुक्रवार रोजी चाळीसगाव येथील के.आर.कोतकर ज्युनिअर कॉलेज ट्रॅक ग्राउंड वर झालेल्या या स्पर्धेत किनगाव इंग्लिश मेडियम निवासी पब्लिक स्कूलच्या संघाने चाळीसगांव संघाचा पराभव करून प्रथम क्रमांक पटकवला.या सामन्यात चाळीसगांव संघाने नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.यावेळी इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल किनगावच्या संघाने ६ गडी बाद ६५ धावाच केल्या.यात अभिषेक बारेला व नरसिंहा पावरा यांनी चांगली फलंदाजी केली तर राेशन बारेलानेही एक ओव्हर मेडन टाकत उत्कृष्ठ गोलंदाजी केली.इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलच्या संघाने चाळीसगाव संघाचा २६ धावांनी पराभव करत विजय मिळवला या विजयी संघात कर्णधार राेशन रमेश बारेला,शिवम कैलाश बारेला,अभिषेक बारेला,चरण रमेश पाटील,विजय नितिन वराडे,लाेकेश दिलीप संगेले, नरसिंहा ढेमसिंग पावरा,विकास सुरेश पावरा,शिवराम सिताराम बारेला,दिपेश राजेंद्र पाटील,कुणाल धनराज पाटील व अमन सिराज तडवी यांनी यशस्वी कामगीरी केली.या सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक दिलीप बिहारी संगेले यांचे मार्गदर्शन लाभले.तर विजयी संघाचे इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील,सचिव मनिष विजयकुमार पाटील,व्यवस्थापक सौ.पुनम मनिष पाटील, प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील,उप प्राचार्य सौ.राजश्री सुभाष अहिरराव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.