Just another WordPress site

डोंगर कठोरा येथे माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन सोहळ्यात गुरुजनांचा सत्कार

माजी विद्यार्थ्यांच्या सत्कारानिमित्त आजी विद्यार्थिनींनी सादर केले गीत

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेज सन १९७२-७३ एसएससी बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेहमिलन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.प्रसंगी कॉलेजमध्ये आयोजित स्नेहमिलन सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष डॉ.राजेंद्रकुमार झांबरे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळ उपाध्यक्ष राजाराम राणे,सचिव दिनकर पाटील,खजिनदार शरद राणे,विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एन.आर.राणे, व्ही.ए.पाटील, जी,डी.सरोदे, के.एस.पाटील,एन.एन.चौधरी,एन.पी.कोल्हे,मंदा जावळे,विकास राणे,विद्यमान मुख्याध्यापक नितीन झांबरे हे उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थ्यांच्या सत्कारानिमित्त आजी विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली.प्रसंगी सदरील बॅचमधील निधन झालेल्या शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी पन्नास वर्षांपूर्वीच्या विद्यार्थी जिवनातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.एकमेकांचा परिचय करून देण्यात आला त्याचबरोबर अनेकांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील व आपल्या आयुष्यातील जीवनशैलीवर विचार मांडले प्रसंगी अनेकांचे डोळे या अनुभवामुळे पाणावले.तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील खट्याळपणा कथन करून मनोरंजनही केले.या स्नेहमिलन सोहळ्याला माजी विद्यार्थी विद्यार्थिनींसह त्यांच्या पत्नी व पती यांनी उपस्थिती दिली होती हे विशेष !.यावेळी व्ही.ए.पाटील, जी,डी.सरोदे व के.एस.पाटील या गुरुजनांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन के.पी.पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वितेकरिता डॉ.प्रमोद राणे,के.पी.पाटील,जनार्धन राणे,गंगाधर वाघ,उल्हास राणे,सतीश महाजन,सखाराम साळुंखे,डॉ.संजीव महाजन,विजय बाऊस्कर,विश्वनाथ पांडव,आशा बेंडाळे,रजनी पाटील यांच्यासह बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.