Just another WordPress site

लहान मुलाला पाण्यात डुबतांना वाचविले मात्र स्वतःचा जीव गमवावा लागला.

जामनेर येथे गणपती विसर्जन प्रसंगी घडली हृदयद्रावक घटना

जामनेर-पोलीस नायक(प्रतिनिधी):-राज्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी बहुतेक सर्व  ठिकाणी गणपती विसर्जन केले जाते.त्याचाच एक भाग म्हणुन आज दि.९ सप्टेंबर २२ रोजी जामनेर येथील एका मंडळाच्या वतीने गणपती विसर्जन येथून जवळच असलेल्या कांग नदीच्या पुलाखाली करण्यात आले.गणपती विसर्जन करीत असतांना  एक लहान मुलगा पाण्यात बुडत असल्याचे दिसताच मयत तरुण किशोर माळी याने त्याला वाचविण्याकरिता पाण्यात उडी मारली.मात्र होत्याचे नव्हते झाले यात लहान मुलाला वाचविण्यात त्याला यश आले पण वाचविणारा स्वतःचे प्राण वाचवू शकला नाही.या हृदयद्रावक घटनेमुळे जामनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की,जामनेर येथे आज दि.९ रोजी गणपती विसर्जन दरम्यान लहान मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात युवक किशोर राजू माळी (वय-२७ राहणार-गणेशवाडी,जामनेर) यास स्वतःचा जीव गमवावा लागला आहे.यावेळी कांग नदीच्या पुलाखाली  गणपती विसर्जन करीत असतांना लहान मुलगा पाण्यात बुडत असल्याचे किशोर माळी या तरुणाच्या लक्षात आले त्याने स्वतःच्या जीवाची तमा न करता व क्षणाचाही विलंब न करता पाण्यात स्वतःला झोकून दिले.यात किशोर माळी याने लहान मुलाला वाचविले परंतु त्यात स्वतःचा जीव गमवावा लागला.पाण्याचा प्रवाह जास्त राहिल्यामुळे किशोरचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.किशोरचा मृतदेह कांग नदी पात्रातून काढण्यात आला व उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.सदरील घटना आज दि.९ सप्टेंबर २२ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.प्रसंगी त्याची पत्नी ,मुले व नातेवाईक मंडळी यांनी एकच आक्रोश केला त्यावेळी अनेकांचे हृदय हेलावले.या घटनेची माहिती जामनेर शहरात वाऱ्यासारखी पसरली त्यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे जामनेर  शहरच नव्हे तर संपूर्ण जिल्हात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.