यावल येथील सरस्वती विद्या मंदिरातील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्यात ३२ वर्षानंतरच्या आठवणींना उजाळा
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील सरस्वती विद्यामंदिर शाळेतील माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी हे सुमारे तिन दशकानंतर म्हणजे ३२ वर्षानंतर एकत्र आले.विद्यालयातील सन १९९० बॅचच्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा सरस्वती विद्यामंदिर विद्यालयात नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.विद्यार्थ्यांच्या शालेय जिवनातील आठवणींना अध्यक्षस्थानी जी.डी.कुळकर्णी,प्रमुख पाहुणे पी.एस.सोनवणे,ए.एम.सोनवणे,ओंकार राणे,निलेश गडे,सोमेश्वर कोष्टी हे होते.
सदरील कार्यक्रम प्रसंगी उपस्थित वयस्क विद्यार्थी व विद्यार्थिनींचा परिचय झाल्यानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपल्या वर्गातील जुन्या आठवणी काढत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.तसेच पी.एस.सोनवणे,ए.एम.सोनवणे यांनी सुरुवातीला हजेरी घेतली व विद्यार्थी विद्यार्थिनींचा गणिताचा तास घेऊन प्रश्नोत्तराचा तास घेऊन सुमारे ३२ वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.यावेळी आपल्या शालेय जिवनातील बालपणाच्या आठवणींनी सर्वांची मने गहिवरून आली.प्रसंगी गुरू व शिष्यांचे आठवणींनी डोळे पाणावले तर शाळेत शिकत असताना केलेल्या गमती जमती सांगुन आनंद लुटला.यावेळी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले म्हणून डॉ.नरेंद्र महाले यांना सन्मानपत्र देऊन तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरूजनांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे विदयार्थी विजय सूर्यवंशी,मृणालिनी काकडे,सुषमा भोईटे यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच पी.एस.सोनवणे यांनी “या चिमण्यांनो परत फिरा रे .. या चिमण्यांनो परत फिरा रे .. घराकडे अपुल्या झाल्या तिन्हीसांजा जाहल्या दहा दिशांनी येईल आता अंधाराला पुर,अशा वेळी असु नका रे आई पासुन दुर,चुकचुक करीते पाल उगाच चिंता मज लागल्या या चिमण्यांनो परत फार रे …..” हे गीत त्यांनी मोबाईल वर माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांना एकवल्यावर सर्वांना अश्रू अनावर झाले.प्रास्ताविक प्रा.श्रीकांत जोशी यांनी व सूत्रसंचालन डॉ.नरेंद्र महाले यांनी केले.तर आभार एन डी भारुडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेकरिता माजी विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिक्षक व सर्व कर्मचारी वृंद आदींनी परिश्रम घेतले.