चोपडा-पोलीस नायक (प्रतिनिधी):-येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित शिक्षणशास्र विद्यालयात प्रथम वर्ष स्वागत समारंभ कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्र विभागाचे प्रा.ए.के.न्यायदे हे होते.कार्यक्रमाची सुरुवात छात्र अध्यापिका यांनी स्वागत गीत म्हणुन केली.याप्रसंगी दीपप्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.ए.के.न्यायदे यांच्या हस्ते करण्यात आले.तर यावेळी सहशिक्षक भैय्यासाहेब देवरे,रजनी अहिरे,स्नेहा राजपुत,शिक्षणशास्त्र विभागाचे लिपिक विपुल बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती राहिली.यावेळी सहशिक्षक भैय्यासाहेब देवरे,रजनी अहिरे व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.ए.के.न्यायदे यांनी शिक्षणाचे महत्त्व तसेच छात्र अध्यापक व शिक्षक यांचे कार्य व जबाबदारी याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.तसेच छात्र अध्यापक व छात्र अध्यापिका यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन छात्र अध्यापिका प्रियंका कोळी व अश्विनी तायडे यांनी केले.तर प्रास्ताविक सहशिक्षक रजनी अहिरे यांनी केले.यशस्वितेकरिता शिक्षणशास्र विभागातील शिक्षक,शिक्षिका,कर्मचारी वर्ग,छात्र अध्यापक अध्यापिका यांनी परिश्रम घेतले.