यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मध्यम शाळेत नेहरू युवा केंद्र जळगाव यांच्या वतीने जिल्ह्यातील निवडक युवक व युवतींसाठी युवा नेतृत्व व समुदाय विकास तसेच व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले.
यावेळी शिबिरातील तरूणाशी संवाद साधून करियर निवड करणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी याबाबत तेजस पाटील यांनी माहिती दिली.तर अनिल भोकरे (उपसंचालक कृषी विभाग जळगाव) यांनी देखील शिबिरात सहभागी विद्यार्थी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासाचे महत्व याबाबत माहिती सांगितली.या प्रशिक्षण शिबीरास जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव,एरंडोल,जळगाव व यावल येथील निवडक चाळीस विद्यार्थ्यां सहभागी झाले होते.प्रसंगी नेहरू युवा केन्द्र जिल्हा समन्वयक तेजस पाटील,जिल्हा बाल कल्याण समिती सदस्य
संदीप निंबाजी पाटील (सोनवणे ),यावल तालुका कृषी अधिकारी एस.बी.सिनारे,मंडळ कृषी अधिकारी ए.एस.खैरनार,इंग्लीश मेडीयम स्कुलचे सचिव मनिष विजयकुमार पाटील यांच्यासह आदी मान्यवर शिबीरास उपस्थित होते.