यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने गौतम अदानी यांच्या उद्योग समुहातील गोंधळलेल्या अर्थकारणाच्या विरोधात आज दि.८ फेब्रुवारी रोजी शहरातील स्टेट बँक कार्यालयासमोर केन्द्र शासनाच्या विरोधात घोषणा देऊन आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार तसेच जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखाली यावल तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे आज दि.८ फेब्रुवारी बुधवार रोजी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखा सातोद रोड,यावल येथे सकाळी ११ वाजता गौतम अदानी यांच्या उद्योग समुहातील गैरकारभाराची केद्रातील नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तातडीने चौकशी करावी या मागणीसाठी तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फ आंदोलन करण्यात आले तसेच स्टेट बँकेचे व्यवस्थापक विजय पी टाले यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले.या आंदोलनात प्रभाकर अप्पा सोनवणे (कॉंग्रेस कमेटी तालुका अध्यक्ष),यावल पंचायत समिती गटनेते शेखर पाटील,नगरसेवक शेख असलम शेख नबी,नगरसेवक समिर मोमीन,नगरसेवक मनोहर सोनवणे,शहर काँग्रेस अध्यक्ष कदीर खान,उपाध्यक्ष अनिल जंजाळे,कोरपावली माजी सरपंच जलील पटेल,अमर कोळी,महिला काँग्रेस पदाधिकारी चंद्रकलाताई इंगळे,आदीवासी विभागाचे बशीर तडवी,नईम शेख,राहुल गजरे युवक काँग्रेस पदाधिकारी,एस.सी.विभाग पदाधिकारी,पक्षाच्या अल्पसंख्याक पदाधिकारी,सेवादलचे पदाधिकारी यांच्यासह इतर कार्यकर्ते व मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.