यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्यु.कॉलेजचे मुख्याध्यापक श्री.नितीन भास्कर झांबरे यांचा आज ५१ वा वाढदिवस आहे.त्यानिमित्ताने आज दि.०९ फेब्रुवारी रोजी नितीन झांबरे सर यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या स्वखर्चातून तसेच त्यांच्याच हस्ते ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थिनींना बिस्कीट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात आज दि.९ फेब्रुवारी रोजी नितीन झांबरे सर यांच्या हस्ते इ. ५वी ते १२ वी पर्यंतच्या किमान ३५० विद्यार्थी विद्यार्थिनींना त्यांच्या स्वखर्चातून बिस्कीट वाटप करण्यात आले.सदरील स्तुत्य निर्णयाचे सर्व थरातून कौतुक केले जात आहे.याप्रसंगी एन.व्ही.वळींकर,पी.पी.कुयटे,आर.पी.चिमणकारे,सचिन भंगाळे,विवेक कुलट,रामेश्वर जानकर,मनीषा तडवी,शुभांगीनी नारखेडे,मोहिनी पाटील,डिम्पल सरोदे,अमीना तडवी,यमुना कोळंबे यांनी यावेळी उपस्थिती देऊन मुख्याध्यापक नितीन झांबरे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.नितीन झांबरे सर यांच्या या स्तुत्य निर्णयाचे सर्व भरातून कौतुक होत आहे.