यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील जळगाव मार्गावरील कोळन्हावी फाट्यावर झालेल्या मोटरसायकल व अज्ञात डंपरच्या भिषण अपघातात गंभीर जखमी झालेला ईस्माइल हबीब तडवी हा तरुण देखील मरण पावल्याचे वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,काल दि.१० फेब्रुवारी रोजी सायंकाळी कोळन्हावी फाटयाजवळ मोटरसायकल व डंपर यांच्या भिषण अपघातातील गंभीर जखमी असलेल्या ईस्माइल हबीब तडवी वय-३० वर्षे रा-सावखेडा सिम ता.यावल या तरूणाचे जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता रात्री १२:३० वाजेच्या सुमारास त्याची निधन झाले.सदरील अपघातात अमोल राजेंद्र पाटील वय-२८ वर्षे रा-सावखेडा सिम,ह.मु.जळगाव या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यु झाला होता परिणामी या अपघातात दोघ तरुणांचे निधन झाले आहे.याबाबत यावल पोलीसांनी रात्री उशीरा या भिषण अपघातास कारणीभुत ठरलेला डंपर क्रमांक एमएच १७ बी डी ३४६८ या वाहनास घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे तर डंपर चालक मात्र फरार झाला असल्याचे पोलीस सुत्रांकडुन सांगण्यात आले आहे.याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात डंपर चालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.तालुक्यातील सावखेडा सिम येथील रहिवाशी ईस्माइल हबीब तडवी वय ३० वर्ष हा तरुण मोलमजुरी करून आपल्या कुंटुंबाचा उदरर्निवाह करीत होता.त्याच्या कुटुंबात त्याच्यासह त्याची पत्नी व एक लहान मुलगी असा परिवार आहे. तर अपघातात मरण पावलेल्या अमोल राजेंद्र पाटील हा पाटील कुंटुंबातील एकुलता एक मुलगा आहे.मयत इस्माईल तडवी हा तरुण जळगाव येथे अमोल पाटील यांच्याकडे घराच्या रंगकामासाठी गेला होता.दरम्यान घराचे रंगकाम आटोपुन हे दोघे जण त्यांच्याकडील मोटरसायकल क्रमांक १९ डी बी २७४६ ने किनगावकडे येत असतांना दि. १० फेबूवारी शुक्रवार रोजी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या सुमारास किनगाव कडुन सुसाट वेगाने जाणाऱ्या डंपरने धडक देवुन झालेल्या भिषण अपघातात अमोल पाटील या तरूणाचा जागीच मृत्यु झाला होता तर ईस्माईल हबीब तडवी हा तरूण गंभीर झाला असता त्याचे जळगाव येथे त्याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला आहे.सदरील घटनेमुळे तालुक्यासह जिह्याभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.