गोपाळ शर्मा
अकोला जिल्हा प्रमुख
तेल्हारा तालुक्यातील जुन्या शहरात असलेल्या श्री.संत गजानन महाराज मंदिर येथे दि.12 फेब्रुवारी 23 रविवार रोजी श्री.गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्ताने भव्य पालखी व शोभायात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात समस्त वारकरी संप्रदाय,महिला मंडळ व भक्त जण यांच्या सहभागातून मुख्य रस्त्यावरून श्री.गजानन महाराज यांची पालखी व शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी शहरभरात ठिकठिकाणी भाविक भक्त महिला व पुरुष यांच्या वतीने श्री.गजानन महाराज पालखीचे मनोभावे पूजन करण्यात आले.प्रसंगी शहरातील तरुण व तरुणी यांनी लेझीम कवायत सादर करून श्री.गजानन महाराज पालखी व शोभायात्रेची शोभा वाढविली.या कार्यक्रमात श्री.गजानन महाराज यांचा सजीव देखावा देखील करण्यात आलेला होता तसेच या कार्यक्रमाला लहानांपासून तर थोरांपर्यंत तसेच आबालवृद्धांनी सहभाग नोंदविला हे विशेष ! श्री.गजानन महाराज पालखी व शोभायात्रा समारोपानंतर मंदिर परिसरात भक्तजनांच्या वतीने महाप्रसादाचा आस्वाद घेण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेकरिता श्री.गजानन महाराज मंदिर ट्रस्ट पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच समस्त वारकरी संप्रदाय,महिला मंडळ व भक्त जण यांचे सहकार्य लाभले.