यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील पोलीस स्टेशन व आजी माजी सैनिक यांच्या वतीने काश्मीर येथील पुलवामा येथे चार वर्षापुर्वी झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी यावल पोलीस स्टेशनमध्ये आयोजित कार्यक्रम प्रसंगी पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर,पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे,पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहीफडे,वरिष्ठ सहाय्यक फौजदार अजीज शेख,सहाय्यक फौजदार नितिन चव्हाण,सहाय्यक फौजदार मुजफ्फर पठान,बिएसएफ जवान महेन्द्र पाटिल,सैनिक अजय अडकमोल,माजी सैनिक व यावल तालुका पैरा मिल्ट्री संस्थेचे अध्यक्ष राजेश जगताप, उपाध्यक्ष अय्युब तडवी,सचिव मोहन येवुल,राजेश बारी,सुनिल कदम,सुधाकर कोळी,सामाजीक कार्यकर्ते पराग सराफ व पोलीस कर्मचारी यांच्या हस्ते काश्मीरच्या पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात देशाचे रक्षण करतांना ४० जवानांनी आपले प्राण गमावले होते.त्याप्रीत्यर्थ या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना त्यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती पेटवुन तसेच त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.