Just another WordPress site

यावल तालुक्यात विविध उपक्रम राबवुन शिवाजी महाराज जयंती साजरी

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे होत्या तर प्रमुख मार्गदर्शक इतिहास विभाग प्रमुख प्रा.गणेश जाधव हे होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील,प्रा.एम.डी.खैरनार होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागाचे डॉ. अनिल पाटील यांनी शिवछत्रपती जयंती साजरी करण्यामागील भूमिका विशद केली.

तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.संध्या सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडे जगभर साजरी केली जाते हे केवळ महाराजांचे नेतृत्व व कर्तुत्व यांचा सन्मान आहे.महाराजांची रयत विषयी जाण,परस्त्री विषयी आत्मीयता,स्वराज्याचा दूरदृष्टीकोन,राजनीती,गनिमी कावा असे अनेक पैलूंमुळे महाराजांचा इतिहास अजरामर आहे म्हणूनच छत्रपतींचा जीवन आदर्श विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा असे प्रतिपादन अध्यक्षिय भाषणात केले.प्रमुख मार्गदर्शक प्रा.गणेश जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर व धोरणांवर प्रकाश ज्योत टाकला.अठरापगड जातींना सन्मान देणारा एकमेव राजा होऊन गेला असे त्यांनी सांगितले.यावेळी कु वैष्णवी माळी हिनेही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.तेजश्री कोलते हिने केले तर आभार कु.हीना सोनवणे हिने मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.एस.पी.कापडे,डॉ.एच.जी.भंगाळे,डॉ.आर.डी.पवार,डॉ.पी.व्ही.पावरा,प्रा.एस.टी.वसावे,प्रा.एम.पी.मोरे,प्रा.राणे आदींनी परिश्रम घेतले.

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश स्कुल,यावल

येथील श्री मनुदेवी शिक्षण प्रसारक मंडळाव्दारे संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.यानिमित्ताने अखंड महाराष्ट्र आराध्यदैवत हिंदवी स्वराज्याचे जनक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती शाळेच्या आवारात कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी कार्यक्रमात सर्व प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात येवुन भावपुर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ.शिला तायडे,प्रशांत फेगडे यांच्यासह तृप्ती पवार,प्रवीणा पाचपांडे,सोनाली वाणी,कामिनी बोंडे,तिलोत्तमा महाजन,श्रद्धा साळुंके,टिना निंबाळे,धनश्री महाजन इत्यादी शिक्षक वृंद तसेच कुसुम फालक,मीनाक्षी वारके,योगेश तळेले इत्यादी कर्मचारी वर्ग यांच्यासह मोठया संख्येत विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होते.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती डांभुर्णी,ता.यावल

तालुक्यातील डांभुर्णी येथे अखंड हिंदुस्तानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती डांभुर्णीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने डांभुर्णी गावातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे आणि पुतळयाच माल्यार्पण करून उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते मनोभावे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आदरणीय श्याम भाऊ सोनवणे,मराठा सेवा संघाचे विभागीय कार्याध्यक्ष शिवश्री रामदादा पवार,यावल पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे,डांभुर्णी गावच्या सरपंच सौ.कल्पना बाविस्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या शिवजयंती कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे तसेच स्वयंदीप प्रतिष्ठानचे सचिव व जिल्हा बाल कल्याण समितीचे सदस्य संदीप निंबाजी पाटील (सोनवणे) यांनी मनोगत व्यक्त केले.प्रसंगी डांभुर्णी ग्रामपंचायत सदस्य शुभम विसवे,सौ.रेखाताई पुरुषोत्तम कोळी तसेच श्री.देवानंद फालक,गावचे प्रतिष्ठित शेतकरी रामचंद्र चौधरी,जितेंद्र चौधरी,अनिल साठे,गजानन सोनवणे,अरविंद बाविस्कर, गिरीश विसवे,दिनेश पवार,विलास भालेराव,दिवाकर पाटील,संजय खर्चे,संजय उत्तम पाटील,प्रफुल्ल वाणी तसेच गावातील ग्रामस्थांची व तरुण वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली.

जिल्हा परिषद मराठी मुला मुलींची शाळा डोंगर कठोरा

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींची शाळेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सदस्य दिलीप तायडे,शाळा व्यवस्थापन समिती तज्ञ शिक्षक सदस्य अनिल पाटील,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश झांबरे,मुख्याध्यपिका विजया पाटील हे होते.

यावेळी आयोजित कर्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले व सामूहिक”गर्जा महाराष्ट्र माझा”हे राष्ट्रगीत म्हणण्यात आले.तर मुख्याध्यापिका विजया पाटील व शाळा व्यवस्थापन समिती तज्ञ शिक्षक सदस्य अनिल पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.आभार मुख्याध्यपिका विजया पाटील यांनी मानले.प्रसंगी मुजेबीन तडवी,चैताली चौधरी.राजू तडवी यांच्यासह विद्यार्थी बहुसंखेने  उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.