यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील जिल्हा परिषद मराठी मुला मुलींच्या शाळेत नुकताच आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख महंमद तडवी,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा धनश्री धनगर,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सदस्य दिलीप तायडे,शिक्षक तज्ञ सदस्य अनिल पाटील,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश झांबरे व महंमद तडवी हे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका विजया पाटील यांनी केले.प्रास्ताविकात त्यांनी आनंद मेळाव्याचा उद्देश्य व हेतू याबाबत माहिती दिली.तर उपशिक्षक शेखर तडवी यांनी आनंद मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना आकडेमोडीसोबतच व्यावहारिक ज्ञान अनुभवायला मिळत असल्याचे नमूद केले.आनंद मेळाव्याची सुरुवात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब आढाळे यांच्या हस्ते व केंद्र प्रमुख महंमद तडवी,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा धनश्री धनगर,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत सदस्य दिलीप तायडे,शिक्षक तज्ञ सदस्य अनिल पाटील,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सुरेश झांबरे व महंमद तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत फित कापून उद्घाटन करण्यात आले.प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते बाल विद्यार्थ्यांकडील वस्तू खरेदी करून त्यांचा आनंद वाढविण्यास प्रोत्साहन देण्यात आले.यावेळी बालविद्यार्थ्यांचे २२ स्टॊल लावण्यात आलेले होते.प्रसंगी बालविद्यार्थ्यांनी खरेदी विक्रीतील अनुभवाचा आनंद लुटला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक शेखर तडवी यांनी केले.कार्यक्रमाला.उपस्थित मान्यवर यांच्या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविका चारू झांबरे,आशा आढाळे,राजू तडवी,चैताली चौधरी,मुजेबीन तडवी यांच्यासह विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.