यावल-पोलिस नायक(प्रतिनिधी):-
येथील शहरातील राहणाऱ्या एका विवाहीत तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.याबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहीती अशी की,येथील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या विवाहित तरुण शिवाजी शामराव गाढे वय ३५ वर्षे याने दि.२१ फेब्रुवारी मंगळवार रोजी दुपारी १ ते १:३० वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शेतात कामास गेली असता व त्याची दोन लहान मुले घराबाहेर खेळत असतांना आपल्या राहत्या घरातील छतालाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.शिवाजी शामराव गाढे हा उच्च शिक्षीत असून लग्नात व विविध कार्यक्रम सोहळ्यात फेटे बांधण्याचे काम करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत होता.व या फेटे बांधण्याच्या कामामुळेच तो सर्वांना पारिचित होता.शिवाजी गाढे यांचा आत्महत्याचा हा त्याचा दुसरा प्रयत्न यशस्वी झाला आहे.याआधी देखील त्याने एक ते दिड वर्षापुर्वी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यावेळेस मित्र मंडळीच्या मदतीने वेळेवर उपचार झाल्याने तो बचावला होता.सदरील घटनेची खबर मयताचा भाऊ अशोक शामराव गाढे यांनी यावल पोलिसांना दिल्याने याबाबत यावल पोलिसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.मयत शिवाजी गाढे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख यांनी केले.पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर व पोलीस करीत आहे.शिवाजी गाढे यांच्या कुटुंबात पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.