यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
शिवसेना व जळगाव जिल्हा अम्युचर मल्लखांब असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने शिवजयंती दिनानिमित्ताने दि.१८ शनिवार रोजी जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यात किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थीनींनी तृतिय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले.
जळगाव मनपा संचलीत विद्या इंग्लिश मेडीयम स्कुलच्या जलतरण तलाव समोरील परिसरात संपन्न झालेल्या या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील सुमारे विविध तालुक्यातील २३ शाळांच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.यावेळी किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थीनींनी तृतिय क्रमांक पटकवला.यात किनगाव शाळेतील खेळाडू पल्लवी बारेला,मनिषा बारेला,स्नेहल पावरा द्वितीय क्रमांकाने तर एंजल बारेला तृतिय क्रमांकावर राहुन यश संपादन केले.या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक नरेंन्द्र भोई व क्रिडाशिक्षक दिलीप बिहारी संगेले यांचे मार्गदर्शन लाभले.तर या जिल्हा पातळीवरील स्पर्धत यशप्राप्त खेळाळुंचे इंग्लीश मिडीयम स्कुलचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, सचिव मनिष विजयकुमार पाटील,स्कुलच्या व्यवस्थापक सौ.पुनम मनिष पाटील,प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील व उप प्राचार्य सौ.राजश्री सुभाष अहिरराव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.