महेंद्र पाटील ,मुख्य उपसंपादक
पोलीस नायक
जळगाव-गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील पोलीस निरिक्षकांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा सुरू होती.त्या अनुषंगाने पोलीस अधिकार्यांच्या जिल्हा अंतर्गत नुकत्याच बदल्या करण्यात आलेल्या आहेत.पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.
जिल्हा अंतर्गत खालील प्रकारे पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.नियंत्रण कक्षातील शिल्पा गोपीचंद पाटील यांच्याकडे रामानंद नगरचा कार्यभार देण्यात आला आहे.नियंत्रण कक्षातील संदीप भटू पाटील यांची चाळीसगाव शहरला बदली झाली आहे.नियंत्रण कक्षातील कावेरी महादेव कमलाकर यांना चोपडा ग्रामीण पोलीस स्थानक मिळाले आहे.सध्या यावलचा प्रभार असणारे राकेश मानगावकर यांच्याकडे यावल पोलीस स्टेशनची जबाबदारी कायम ठेवण्यात आलेली आहे.नियंत्रण कक्षातील रंगनाथ धारबळे यांना जि.वि.शा.जळगाव येथे पोस्टींग मिळाली आहे.नियंत्रण़ कक्षातील बबन मारूती आव्हाड यांना चाळीसगाव ग्रामीण देण्यात आले आहे.उध्दव डमाळे यांची धरणगाव पोलीस स्थानकात पोस्टींग झाली आहे.राजेंद्र प्रल्हाद पाटील यांना भडगाव पोलीस स्थानकाची धुरा सांभाळायास मिळाली आहे.विजय शिंदे यांना अमळनेरची जबाबदारी देण्यात आली आहे.सतीश गोराडे यांना एरंडोल पोलीस स्थानक मिळाले आहे.जयपाल हिरे यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनचा कार्यभार मिळाला आहे.ज्ञानेश्वर जाधव यांच्याकडे जिल्हापेठ पोलीस स्टेशनचा कार्यभार देण्यात आला आहे.अशोक उतेकर यांची भडगावहून सायबर पोलीस स्थानकात बदली करण्यात आले आहे.संजय ठेंगे यांची चाळीसगाव ग्रामीण वरून नियंत्रण कक्षात बदली झाली आहे.मुक्ताईनगरचे शंकर शेळके यांची जळगाव शनिपेठ स्थानकात बदली झाली आहे.धरणगावचे राहूल खताळ यांची पाचोरा पोलीस स्थानकात बदली झाली आहे तर कांतीलाल काशिनाथ पाटील यांची चाळीसगाव शहरवरून चोपडा शहर पोलीस स्थानकात बदली
झालेली आहे.सर्व नव नियुक्ती व बदली झालेल्या पोलीस निरिक्षकांनी तात्काळ विहित ठिकाणी जाऊन आपल्या पदांचा कार्यभार सांभाळावा असे निर्देश पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी दिले आहेत.