यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील साकळी येथील अल्पवयीन शाळकरी मुलाचा पाटचारीच्या पाण्यात पडुन बुडून मरण पावल्याची दुर्देवी घटना नुकतीच घडली आहे.या घटनेबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की,तालुक्यातील साकळी येथील अल्पवयीन शाळकरी विद्यार्थी निखिल मुकुंदा सोनवणे वय १४ वर्षे राहणार आंबेडकर नगर हा इयत्ता १० शिकणारा मुलगा साकळी शिवारातील पाटचारी जवळ दि.२२ फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी ८ वाजता आपल्या बकऱ्या चारण्यासाठी गेला होता.यावेळी गावातीलच राहणारा रणविर भिला सोनवणे हा देखील त्याच्या सोबत बकऱ्या चारण्यासाठी गेला होता.मात्र यावेळी निखिल सोनवणे हा पाटचारीच्या पाण्यात हातपाय धुण्यासाठी गेला असता त्याचा पाय सरकुन तोल जावुन पाण्यात बुड्डन मरण पावला.यावेळी त्याच्यासोबत असलेल्या रणविर सोनवणे याने तात्काळ गावाकडे धाव घेत घटनेची सविस्तर माहीती कळविल्याने यावेळी गावातील काही तरूणांनी घटनास्थळी धाव घेत निखिल सोनवणे यास पाटचारीतुन तात्काळ बाहेर काढुन यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी मृत्यु घोषीत केले.याबाबत यावल पोलीस ठाण्यात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.निखिल सोनवणे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख यांनी केले.