Just another WordPress site

कापसाला हमीभाव देण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

येथील तालुका प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटना यांच्यावतीने तहसीलदार महेश पवार यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच देण्यात आले.तसेच शेतकऱ्याच्या या विविध समस्या तात्काळ सोडविण्याची मागणीही करण्यात आली.

सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यांच्यावर होणारे अन्याय लवकरात लवकर दूर करण्यात यावे,तसेच शेतकऱ्यांच्या कापसाला किमान बारा हजार रुपये हमीभाव देण्यात यावा,शासनाने शेतकऱ्यांच्या कापसाची आठ दिवसांत खरेदी करुन आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा.तसे न झाल्यास संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष सुरेश पाटील,तालुका अध्यक्ष नंदकिशोर सोनवणे, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष  गोकुळ कोळी,उपाध्यक्ष योगेश कोळी,तालुका संघटक राकेश भंगाळे,तालुका सरचिटणीस नितीन सपकाळे, सोशल मीडिया अध्यक्ष सचिन कोळी,फैजपूर शहर अध्यक्ष मोहसिन भाई,यावल शहर अध्यक्ष नितीन बारी,सुनील बोदडे,दिनकर गवळी, धनसिंग सपकाळे तसेच इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तहसीलदार महेश पवार यांना निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.