नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व राजकीय पक्ष आजपासुनच तयारीला लागले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील महाराष्ट्राबाहेर पक्षाचा विस्तार करण्याकरिता प्रयत्न सुरु केले आहे.परिणामी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कर्नाटक व हरियाणामध्ये पक्षविस्तार करायचा आहे.यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात,झारखंड,केरळ व लक्षद्वीप या राज्यांमध्येच काही जागांवर विजय मिळविता आला आहे.२०१४ लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणुन ओळख निर्माण करायची आहे.त्यानिमित्त नवी दिल्ली येथे राष्ट्रवादी पक्षाचे दोन दिवशीय राष्ट्रीय अधिवेशनाचे तालकटोरा मैदानावर आयोजन करण्यात आले आहे.यात अधीवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.त्यामुळे शरद पवार हे आता पुढील चार वर्षाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहणार आहेत.अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.
शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत.देशातील प्रमुख विरोधी पक्षनेता म्हणून शरद पवार यांचेकडे पहिले जात आहे.शरद पवार यांनी आपल्या चाणक्य बुद्धिमत्तेच्या आधारावर महाराष्ट्रात २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना व काँग्रेस यांना एकत्र करून महाविकास आघाडी स्थापन करण्यात यश मिळविले होते.हि बाब सम्पूर्ण देशभर चर्चेचा विषय ठरली होती.आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विरोधी पक्षांची संयुक्त आघाडी असण्याबाबतची चर्चा जोर धरू लागली आहे.यानिमित्ताने विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढावी अशी इच्छा विरोधी पक्षांच्या सर्वच प्रमुख नेत्यांची आहे.विरोधी पक्ष निवडणुकीपूर्वी एकजूट झाल्यावर निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मजबूत असायला हवी हि धारणा राष्ट्रवादी नेत्यांची आहे.यामुळे आगामी काळात महाराष्ट्राबाहेर गुजरात,हरियाणा व कर्नाटक या राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पुनश्च निवड करण्यात आलेली असल्याने त्यांची पक्षावरील पकड अधिकच मजबुत होणार आहे.