यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):-
तालुक्यातील किनगाव येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह संस्था संचलीत नेहरू विद्यालयात इयता.१०वीच्या
विद्यार्थ्यांना निरोप व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यानिमित्त आयोजित विद्यालयाच्या प्रांगणावर संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे जेष्ठ संचालक व नेहरू विद्यालयाचे चेअरमन उमाकांत रामराव पाटील होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून किनगाव बुद्रूकच्या सरपंच सौ.निर्मला पाटील व किनगाव खुर्दचे सरपंच भूषण पाटील,प्रगतशील शेतकरी चंद्रकांत विठ्ठल चौधरी व भरारी फाउंडेशन अध्यक्ष दीपक परदेशी हे होते.
यावेळी मुख्याध्यापक सी.के.पाटील यांनी विद्यार्थ्यांना एस.एस.सी.परीक्षेकरिता आवश्यक सूचना देऊन मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.तर श्रीमती एस.पी.भोईटे यांनी अनेक उदाहरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आपले मनोगत व्यक्त केले.तसेच श्रीमती एस.पी.यावलकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना परीक्षेकरीता शुभेच्छा दिल्या.बक्षिस वितरण कार्यक्रमात इ.५ वी ते इ.१० वीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शालेय स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरण करण्यात आले.यात दरवर्षी प्रगतशील शेतकरी चंद्रकांत विठ्ठल चौधरी यांच्याकडून इ.५ वी ते इ.१० वीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १००० रुपये याप्रमाणे एकूण ५००० रुपयांचे बक्षीस चंन्द्रकांत चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले.तसेच सरोजिनी चंद्रकांत पाटील यांच्याकडून गरीब होतकर व हुशार विद्यार्थ्यांना १०००रूपयांचे रोख बक्षीस शाळेतील धवल रवींद्र पाटील या विद्यार्थ्याला देण्यात आले.तसेच हेमराज तुकाराम झटके यांचेकडून १० हजार रूपयांचे ठेवीवरील व्याज इ.१० वीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस हे बक्षीस पुढील वर्षापासून घोषित केले.तर तन्मय कृष्णाकरी गोसावी हा विद्यार्थी इ.१० वीत किनगाव केंद्रातून ९६.४०% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाल्याने त्याचा स्मृतीचिन्ह देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी इ.१० वीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर इ.१० वीचा आदर्श विद्यार्थी सौरभ शरद पाटील व आदर्श विद्यार्थिनी कु.मयुरी रमेश पाटील यांना स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.डी.शिकोकार यांनी केले तर आभार श्रीमती स्नेहा भोईटे यांनी मानले.सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.