यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
यावल बोरावल रस्त्यावरील शहरापासुन दोन किलोमिटर अंतरावर असलेल्या हतनुर पाटचारी जवळ असलेल्या उताराच्या रस्त्यावर ऑपेरिक्षा पलटुन झालेल्या भीषण अपघातात १२ जण जखमी झाले असुन यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत मिळालेली माहीती अशी की,यावल शहरापासुन दोन किलोमिटर लांब बोरावल रस्त्यावर हातनुर पाटचारी जवळ दि.२४ फेब्रुवारी शुक्रवार रोजी यावलचा आठवडे बाजार दिवस असल्याने बाजार खरेदी करून सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास यावल कडून बोरावल गावाकडे जाणारी ऑपेरिक्षा ही प्रवासी वाहतुक करणारे खाजगी वाहन क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने वेगात असलेल्या रिक्शाचा अचानक तोल सुटल्याने पलटी झाली.या भिषण अपघातात कमलाबाई मधुकर पाटील वय ६० वर्ष,गुलाबचंद निशाद(नाभिक) वय ७२वर्ष, मनिषा खंडु महाजन वय ४२ वर्ष,वनदा गणपत बारेला वय १६ वर्ष,सिमा केसराम बारेला वय २३ वर्ष,लेदलीबाई कृष्णा बारेला वय ४५ वर्ष, मजीला दुरासिंग पावरा वय २३ वर्ष,कमलाबाई भास्कर धनगर वय ४५वर्ष,अशोक देविदास महाजन वय ५५ वर्ष,संगीता अनिल पाटील वय ३२वर्ष,निर्मला राजाराम भालेराव वय ५० वर्ष व उषाबाई सुरेश धनगर वय ५० वर्ष सर्व राहणार बोरावल तालुका यावल असे १२ जण जखमी झाले असुन त्यातील दोन जणांची प्रकती गंभीर आहे.सदरील अपघाताची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना मिळेल त्या वाहनांनी तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर चार जणांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.