गोपाल शर्मा
अकोला जिल्हा प्रतिनिधी
जिल्ह्यातील तेल्हारा येथील मेनरोड वरील संताजी चौकात असलेल्या “टाले हॉस्पिटल”मध्ये विविध असाध्य आजारांवर अल्प दरात उपचार करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.याबाबत “टाले हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर”चा शुभारंभ कार्यक्रम मोठ्या थाटात नुकताच पार पडला.
यानिमित्त आयोजित “टाले हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर”चे उदघाटन महंत प.पु.श्री.रामभारतीजी महाराज महामंत्री जुना आखाडा चांगेफळ आश्रम यांच्या हस्ते करण्यात आले.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.अशोकराव बिऱ्हाडे हे होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर,पोलीस उपनिरीक्षक गणेशराव कायंदे,गीताई हॉस्पिटल अकोटच्या संचालिका डॉ.गुंजन वलसिंगे,टाटा हॉस्पिटलचे डॉ.अविनाश तळे,डॉ.मनोहर चाकोते,डॉ.मधुकरराव मुनेश्वर,डॉ.बाबुराव शेळके,डॉ.अशोक तापडिया,डॉ.अनिल मल्ल, डॉ.आर.ए.राठी,अग्निशमन अधिकारी रुपेश जोगदंड,डॉ.ओ.आर.चौधरी,डॉ.डी.एन.राठी,डॉ.डी.टी.जायले,डॉ.संजीवनी बिऱ्हाडे,डॉ.गीता मल्ल,डॉ.दीपक राऊत,डॉ.निशांत वाकोडे,डॉ.राहुल सदाफळे,डॉ.पंकज राठी,डॉ,विक्रम जोशी इ.मान्यवर उपस्थित होते.यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ.आशिष टाले यांनी सुरु केलेल्या “टाले हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर”च्या स्तुत्य निर्णयाचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या हॉस्पिटलमध्ये हृदयरोग,उच्चरक्तदाब,मधुमेह,थायराईड,दमा,टीबी,किडनीचे आजार, संधिवात, अनिमिया,ल्युकेमिया,प्यारालिसिस,फिट,मिरगी,पित्ताशय,टायफाईड,कावीळ,सर्पदंश व विषबाधा व एच आय व्ही अशा असाध्य आजारांवर अल्प दरात उपचार उपलब्ध करून देण्यात येतील व रुग्णांची सेवा केली जाईल अशी मनीषा डॉ,आशिष टाले यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वितेकरिता शालिग्राम तळे,गंगाबाई तळे,प्रशांत ताडे,अर्चना तडे,महेश टाले,पायल टाले,पद्माबाई चंदन,पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ डांगे,गोपाळ डांगे यांनी परिश्रम घेतले तर या हॉस्पिटलच्या माध्यमातून परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.आशिष टाले व शुभांगी टाले यांनी केले आहे.