यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित,कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सदरील कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉ.सचिन देशमुख,पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे,शनयू रुग्णालय यावल येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.कल्पना देशपांडे हे होते.प्रसंगी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.कल्पना देशपांडे यांनी स्त्रियांचे आरोग्य व घ्यावयाची काळजी तसेच स्त्रियांनी आपल्या आरोग्याबद्दल नेहमीच दक्ष असायला हवे कोणत्याही आजाराची वेळीच तपासणी केली पाहिजे ग्रामीण भागात आजही आरोग्य विषयक सुविधांचा अभाव आहे अशा ठिकाणी जनजागृती झाली पाहिजे अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.तसेच ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर डॉ.सचिन देशमुख यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की स्त्रियांनी मासिक धर्मासंबंधी सजग राहिले पाहिजे,रोजचा दिनक्रम निवडला पाहिजे त्याचबरोबर योगासने,प्राणायाम व आहाराबद्दल जागृत असले पाहिजे असे सांगितले.तर पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे यांनी आत्मनिर्भर बनण्याकरिता युवतींच्या सहभागाबाबत विस्तृत असे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले की आरोग्य ही शरीराची व मनाची संपत्ती आहे प्रत्येक मुलीने आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे आहे तसेच आत्मनिर्भर होण्यासाठी स्वावलंबी झाले पाहिजे असे नमूद केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.एस.पी.कापडे यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्राची पाटील यांनी केले व आभार तेजश्री कोलते हिने मानले.यावेळी उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील, प्रा.डॉ पी व्ही पावरा,प्रा.डॉ.एच.जी.भंगाळे,प्रा आर.डी.पवार, प्रा.डॉ.अनिल पाटील,प्रा डॉ.संतोष जाधव,प्रा.सुभाष कामडी,प्रा गणेश जाधव,प्रा.सी.टी.वसावे,प्रा.ईश्वर पाटील,प्रा.मिलिंद मोरे,प्रा.डॉ.निर्मला पवार,प्रा.भारती सोनवणे,प्रा.वैशाली कोष्टी,मिलिंद बोरघडे,प्रमोद कदम,संतोष ठाकूर,प्रमोद भोईटे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.