यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
शेतकरी बांधवांच्या २०२२-२०२३ वर्षाच्या उत्पादीत रब्बी हंगामात केंद्रशासना कडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र यावल उपअभिकर्ता संस्था म्हणून जिल्हा पणन अधिकारी यांचे आदेशानुसार तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत हरभरा खरेदीसाठी नावनोंदणी आज दि.१ मार्च पासून सुरू होणार असल्याची माहीती सोसायटीचे चेअरमन राकेश फेगडे यांनी दिली आहे.
यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आधार कार्ड झेरॉक्स,बॅक पासबुक झेरॉक्स,हरभरा पिकाचा ऑनलाईन चालु रब्बी हंगामाचा पिक पेरा नोंदविलेला ७/१२ उतारा घेऊन कोरपावलीच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटी संस्थेशी संपर्क करावा.शासनाच्या वतीने शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते.या खरीदीअंतर्गत हमीभाव ५३३५ रू व उत्पादकता १३५० किलो हेक्टरी मिळणार असल्याची माहीती राकेश वसंत फेगडे चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी कोरपावली तालुका यावल यांनी दिली आहे.