Just another WordPress site

पुज्य भन्ते अश्वजीत यांचे हृदयविकाराने ११ रोजी दुःखद निधन

आज दि.१२ सप्टेंबर रोजी अकोला येथे होणार अंत्यसंस्कार

अकोला-पोलीस नायक(प्रतिनिधी):-बौद्ध धम्मसंस्कार वर्गाचे मुख्य प्रवर्तक व दैनिक सम्राट वृत्तपत्राचे प्रमुख स्तंभलेखक पूज्य भन्ते अश्वजीत यांचे काल दि.११ सप्टेंबर २२ रोजी रात्री १०.३० वाजता प्राणज्योत मालवली.आज दि.१२ सप्टेंबर २२ रोजी सायंकाळी ४ वाजता बुद्ध भुमी शिर्ला,अकोला येथे भिक्खु संघाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.भन्ते अश्वजीत  त्यांच्या निधनामुळे अखिल बौद्ध समाज बांधवांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सध्या भुसावळ येथे त्यांचा वर्षावास(धम्मसंस्कार )वर्ग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.त्याठिकाणी धम्मसंस्कार करीत असतांना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.त्यांना लागलीच गोदावरी हॉस्पिटल साकेगाव येथे नेण्यात आले.त्याठिकाणी त्यांची एन्जिओप्लास्टी करण्यात आली.यात दोन ब्लॉकेज काढण्यात डॉक्टरांना यश आले होते.मात्र पुन्हा तीन दिवसांनी त्यांची पुन्हा तब्बेत बिघडल्याने त्यांना तात्काळ डॉ.राजेश मानवतकर यांच्याकडे उपचारकरिता दाखल केले.याठिकाणी डॉ.मानवतकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु त्यांना त्यात यश आले नाही व शेवटी काल दि.११ सप्टेंबर २२ रोजी रात्री १०.३० वाजता पूज्य भन्ते अश्वजीत हे बुध्दवाशी झाले.

पूज्य भन्ते अश्वजीत यांनी वृत्तरत्न सम्राट या वृत्तपत्र व अन्य साप्ताहिक तसेच मासिकांमधून बौद्ध धर्म संस्काराबाबत सातत्याने लिखाण केले.बौद्ध धर्मावर आधारित त्यांचे अनेक लेख प्रकाशित आहेत.त्यांचे चरथ भिक्खवे चारिकं व धम्म सागरातील शंखशिंपले हि दोन पुस्तके रमाई प्रकाशन औरंगाबाद यांनी प्रकाशित केलेली आहेत.भन्ते अश्वजीत यांची थोडक्यात ओळख म्हणजे धम्माचा प्रचार व प्रसार ते फळ्यावर लिहून व समजावून सांगत असत.लहान मुलांना शाळेत शिकवितात तसेच त्यांनी लहान मुलांना शिकविले.प्रत्येक समाजबांधवांमध्ये संस्कार करण्यात त्यांचा मोठा हातखंडा होता.प्रश उत्तराच्या माध्यमातून देखील त्यांनी उपदेश केला.महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात  ठिकठिकाणी खेडेगाव व शहरांमध्ये जाऊन लहान मोठ्या कार्यशाळा घेऊन समाज प्रबोधन केले.अशा या प्रतिभावान धम्मसंस्कारकाचे काल दि.११ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज दि.१२ सप्टेंबर २२ रोजी सायंकाळी ४ वाजता बुद्ध भुमी शिर्ला,अकोला येथे भिक्खु संघाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे.त्यांच्या निधनाबद्दल समाज बांधवांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.