यावल-पोलीस नायक(प्रतिनीधी):-
तालुक्यातील किनगाव येथील पिक संरक्षण संस्थेच्या चेअरमनपदी प्रमोद रामराव पाटील तर व्हाइस चेअरमनपदी जिल्हा परिषद माजी सदस्या सुशिला जनार्दन कोळी यांची नुकतीच निवड करण्यात आली.
नवनिर्वाचीत चेअरमन प्रमोद पाटील व व्हा.चेअरमन सुशीला कोळी यांना माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी,किनगाव येथील प्रगतशील शेतकरी सुरेश जिवराम चौधरी,चंन्द्रकांत चौधरी,यावल पंचायत समिती माजी उपसभापती उमाकांत रामराव पाटील,किनगाव बुद्रूक सरपंच निर्मला पाटील,संजय पाटील,किनगाव खुर्द सरपंच भुषण नंदन पाटील,व्ही.मार्ट व विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक मनिष विजयकुमार पाटील,ग्राम पंचायत सदस्य बबलु जनार्दन कोळी,माजी सरपंच टिकाराम मुरलीधर चौधरी,सामाजीक कार्येकर्ते डॉ.योगेश पालवे, वि.का.सो.चेअरमन विनोद देशमुख,माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत भगवान पाटील,समीर गुलशेर तडवी,संजय वराडे,प्रफुल्ल पाटील, डाँ.अनिल बोरसे,वसंत मराठे,अशोक रामदास मोरे,रेशीमशेती गृप,किनगाव ग्रामस्थ व परीसरातील मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे.सदरील निवडणूकी दरम्यान निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून डी.जे.तडवी तर सहाय्यक निवडणूक निर्णय आधिकारी म्हणून संस्थेचे सचिव प्रकाश काशीनाथ पाटील यांनी काम पाहीले.