यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यासह रावेर व चोपडा तालुक्यात अवैध वृक्षांची तोड करणारा माफीया वर्ग मोठया प्रमाणावर सक्रीय झाला असुन सदरील माफिया वर्ग सातपुडा पर्वतातील व परिसरातील वृक्षाची सर्रास कत्तल करून परप्रातांत पाठविण्यात येत आहे.याबाबत यावल पुर्व वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर व गस्ती पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२८ फेबूवारी रोजी वन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या धाडसी कार्यवाहीत विना परवाना अवैध तोड केलेल्या लाकुडासह सुमारे चार लाख १६००० रूपये किमतीचे लाकूड व वाहन जप्त करण्यात आहे.वन विभागाच्या या धाडसी कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.तर सदरील कार्यवाहीमुळे वृक्षतोड माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
याबाबत वनविभागाच्या सुत्रांकडुन मिळालेली माहिती अशी की,दि.२८ फेबुवारी रोजी १० वाजेच्या सुमारास यावल फैजपुर मार्गावरील रस्त्यावर महाविद्यालयाच्या काही अंतरावर पुढे पुर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर व गस्ती पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आनंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगार वनरक्षक भैय्यासाहेब गायकवाड,वनमजुर अशोक माळी हे आपल्या पथकासह गस्तीवर असतांना ट्रक वाहन क्रमांक एमएच १६,ए ई ९३१७ या वाहनातुन संशयीत आरोपी ट्रक वाहन चालक जुम्मा नबाब तडवी राहणार कोरपावली तालुका यावल हा त्याच्या ताब्यातील टाटा आयसर या वाहनातुन विनापरवाना निम पापडी प्रजातीचे १८००० घन मिटर जळाऊ किंमत १६००० रूपये व टाटा आयसर ट्रक वाहन किंमत चार लाख रुपये असे मुद्देमालासह जप्त करण्यात आले आहे.याप्रकरणी जुम्मा नबाब तडवी याच्या विरूद्ध भारतीय वन अधिनियम १९२७,महाराष्ट्र वन नियमावली २०१४ अन्वये आगार वनरक्षक यावल यांनी प्र.रि.नं. ०२/२०२३ दि.२८ फेब्रुवारीचा वन गुन्हा नोंदविला आहे.या गुन्ह्याचा तपास वनसंरक्षक धुळे(प्रा) दिगंबर पगार व सहाय्यक वनसंरक्षक यावल प्रथमेश हाडपे, यावल पुर्व वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगर कठोरा वनक्षेत्राचे वनपाल रवींद्र तायडे हे करीत आहे.यावल पूर्व वनविभागाच्या वृक्षतोड माफीया विरूद्ध सुरू झालेल्या या मोहीमेमुळे वृक्षतोड माफीयामध्ये एकच खळबळ उडाली आहे.