Just another WordPress site

यावल महाविद्यालयात एम बी ए व सीईटी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने एम.बी.ए. प्रवेश परिक्षा व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून एम.बी.ए.इन्स्टिट्यूट साकेगाव येथील ग्रंथपाल विनोद काकडे व प्रा.योगेश रोटे उपस्थीत होते.प्रसंगी विनोद काकडे यांनी विद्यार्थ्यांना एम.बी.ए.प्रवेश प्रक्रिया,सीईटी अभ्यासक्रम व करिअर संबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील यांनी कोणत्याही शाखेच्या पदवी नंतर एम.बी.ए.ला प्रवेश घेता येतो त्याकरीता कोणतेही दडपण न ठेवता विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी व जिद्द असायला हवी असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा.डॉ.एस.पी. कापडे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.अनिल पाटील यांनी मानले.सदरील कार्यक्रम यशस्वीतेकरीता महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.