यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने तिथीप्रमाणे साजरी करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवासाठीची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे.
राज्यात दि.१० मार्च २०२३ ला तिथी प्रमाणे साजरी होणाऱ्या शिवजयंती निमित्ताने दि.२ गुरूवार रोजी यावल येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यालयात शिवजयंती तिथेप्रमाणे उत्सवानिमित्त शिवजयंती महोत्सव उत्सव समितीची कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे.या शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ.विवेक अडकमोल तर उपाध्यक्ष म्हणून स्वप्निल करांडे यांची निवड करण्यात आली आहे.याशिवाय खजिनदार म्हणून सचिन कोळी यांची निवड करण्यात आली आहे.या बैठकीला शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,संतोष धोबी,शरद कोळी,सागर देवांग,सुनील वारी,पप्पू जोशी,जितु फालक,योगेश राजपूत,योगेश चौधरी,अजहर खाटीक,विजु कुंभार,पिंटू कुंभार यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.