Just another WordPress site

यावल येथे महाविकास आघाडीच्यावतीने मुख्याधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून नोंदवला निषेध

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

येथील नगर परिषदमध्ये मागील सहा ते सात महिन्यांपासुन कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहरवासीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.सदरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेता काळ.काल दि.३ मार्च रोजी महाविकास आघाडीच्या वतीने संताप व्यक्त करून यावल नगर परिषदेतील मुख्याधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून निषेध नोंदविण्यात आला.

याबाबत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल नगर परिषदला मागील सहा ते सात महीन्यांपासुन कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने सद्याच्या परिस्थितीला चोपडा येथील मुख्याधिकारी यांच्याकडे प्रभारी कारभार सोपविण्यात आला आहे.त्यामुळेचोपडा येथील मुख्यधिकाऱ्यांना यावल नगर परिषदसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने नागरीकांना मुलभुत सुविधांसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.यावल शहराची लोकसंख्या व व्याप्ती पाहता शहर विकासाच्या दृष्टीने नियोजन शुन्य कामे होत असल्याने नागरीकांना आपल्या विविध कामासाठी नगरपरिषदमध्ये वारंवार हेलपाटेखावे लागत आहेत परिणामी नगर परिषदच्या कारभारावर नागरीकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.मागील तिन ते चार महीन्यांपासुन लांबणीवर पडलेल्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे लोकप्रतिनिधी,नगरसेवक नसल्याने शासनाकडून प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे त्यामुळे प्रशासक कारभारामुळे शहरवासीयांच्या आरोग्यासह विविध समस्या सोडविण्याकामी प्रशासन अपुर्ण पडत आहे.तरी यावल नगरपरिषदला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळण्याच्या मागणीसाठी यावल तहसीलदार महेश पवार यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,राष्ट्रवादी तालुका महिला आघाडीच्या प्रतिभा निळ,मोहसीन खान,कामराज घारू,शरीफ तडवी,बापु जासुद,प्रकाश पारधे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहे.यानिमित्त नगर परिषदच्या मुख्याधिकारी अभावी रिकाम्या असलेल्या खुर्चीला संत्पत भावना व्यक्त करीत महाविकास आघाडीच्या घटक पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना(ठाकरे गट)यांनी रिकाम्या खुर्चीला पुष्पहार घालून निषेध नोंदविला आहे.यावेळी मोहसीन खान,शिवसेने(ठाकरे गटाचे )शहरप्रमुख जगदीश कवडीवाले,शिवसेना तालुका उपप्रमुख शरद कोळी,संतोष धोबी,बापु जासूद,आबिद कच्छी,ईरफान खान यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपास्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.