Just another WordPress site

डोणगाव येथे ६ व ७ मार्च रोजी खंडोबा महाराज यात्रा उत्सव

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

तालुक्यातील डोणगाव येथे पंचक्रोशितील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री.खंडोबा महाराज यांची यात्रा दि.६ व ७ मार्च रोजी प्रथमच आयोजीत करण्यात आलेली आहे.

यानिमित्ताने गावातील सर्व मंदीरांना आकर्षक अशी विद्युत रोशनाई करून सजविण्यात आले आहे.या दोन दिवसीय यात्रोत्सवादरम्यान दि.६ रोजी सकाळी ९ वाजता आरती व रात्री ९ वाजता किसनराव व भिमराव वाघुजी मंडळ मोरदड आणि दहयाणे ता.जि.धुळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तर दि.७ मार्च रोजी सकाळी ५ वाजता मूर्ती अभिषेक व महाआरती,दुपारी ४ वाजता श्री खंडोबा पालखीची मिरवणूक काढण्यात येणार आहे.तरी परिसरातील भाविकांनी या यात्रोत्सवाच्या निमित्ताने यात्रेत सहभागी होऊन खंडोबाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन डोणगाव ग्रामस्थांनी केले आहे.या यात्रोत्सवास यशस्वी करण्यासाठी आई एकविरा ग्रुप मित्र मंडळ,शिवराजे मित्र मंडळ,छत्रपती शासन ग्रुप,सम्राट ग्रुप,महिला बचत गट,स्वप्नातील डोणगाव ग्रुप,रॉयल फौजी श्री योगेश भाऊ पाटील मित्र परिवार व डोणगाव ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.