गोपाल शर्मा,पोलीस नायक
अकोला जिल्हा (प्रतिनिधी):-
तेल्हारा तालुक्यातील धुलघाट येथील जंगल मार्गाने व्याघ्र प्रकल्पातून झरी गावाकडून हिवरखेड गावाकडे गोवंश कत्तलीसाठी जात असल्याबाबत पोलीस उपनिरीक्षक गोपाल दातीर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या द्वारे सापडा रचून दि.३ रोजी केलेल्या पोलीस कारवाईत ६ बैल किंमत अंदाजे ८२०००/- रु.चे जप्त करून ताब्यात घेण्यात आले असून आरोपीविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,दि.३ रोजी हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल दातीर यांना गुप्त माहिती मिळाली की,धुलघाट येथून जंगलाच्या मार्गाने व्याघ्र प्रकल्पातून झरी गावाकडून गोवंश कत्तलीसाठी हिवरखेड गावाकडे जात असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गोपाल दातीर,ठाणेदार विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कौन्स्टेबल सर्वेश कांबे,धीरज साबळे,नापोकौन्स्टेबल गिरधर चौहान यांच्या पथकाने हिवरखेड येथील नदी सिंचन कार्यालयाजवळ झरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नाकाबंदी केली असता रात्री ११ वाजेच्या सुमारास शेख समीर शेख राहुल्ला वय २२ वर्षे रा.हिवरखेड ता.तेल्हारा हा ६ अशक्त गोवंश बैल जातीचे घेऊन जातांना आढळून आला.पोलिसांनी केलेल्या चौकशीअंती सदरील बैल हे शेख यांवर शेख रऊफ रा.पेठपुरा हिवरखेड ता.तेल्हारा याचे असून शेख समीर शेख राहुल्ला हा मजुरीने हे बैल नेत होता.सदरहू पोलिसांनी शेख समीर शेख राहुल्ला याचेकडून वेगवेगळ्या वर्णनाचे व किंमतीचे असे एकूण ८२०००/-रु.चे जप्त करून ताब्यात घेतले व आरोपीविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून जप्त बैलांना सुरक्षा व देखभाल कमी गोरक्षण संस्था अकोट येथे दाखल करण्यात आले आहे.सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार नेवारे मेजर व पो.नामदार विनोद गोलाईत करीत आहेत.