Just another WordPress site

शेताच्या बांधावरील वृक्षतोड करीत शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी):-

येथील यावल शेतशिवारातील शेतमालकाच्या परवानगी न घेता संमतीविना शेतातील बांधवरील तीन ओले जिवंत झाडे तोड करून पंचवीस हजार रुपयांचे नुकसान करीत शेतमालकास शिवीगाळ करीत धमकी दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की,यावल येथील राहणारे रवींद्र दगडू सोनार यांचे यावल शिवारातील शेत गट क्रमांक ६६४ मध्ये शेतातील बांधावरील एक बाभूळ,एक निंब व एक कहीटाचे झाड होते.यावेळी यावल येथीलच रहिवासी पप्पू छोटू पटेल राहणार विरार नगर या इसमाने शेत मालकास न विचारता परस्पर २५ हजार रुपये किमतीची ओली जिवंत झाडे कापून शेतमालकाचे नुकसान करून पुन्हा त्यांच्या यावल येथील दुकानात जावुन पप्पु पटेल याने संदीप रामदास गुरव व स्वप्नील रविन्द्र देवरे यांना शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.याबाबत शेतमालक रविन्द्र सोनार यांनी यावल पोलीस ठाण्यात पप्पु छोटू पटेल याच्या विरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी यावल पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

यावल शहर व तालुक्यात मोठया प्रमाणावर वनजमिनीवरील तसेच शेतकऱ्यांच्या बांधावरील व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील चोपडा-यावल,यावल फैजपुर व भुसावळ जाणाऱ्या मुख्य मार्गाच्या कडेला दुर्तफा असलेली विस पंचाविस वर्षापासुनची जिवंत असलेली झांडाची विनापरवानगी “हम करे सो कायदा”प्रमाणे कत्तल करण्यात येत आहे.या वृक्षतोडीला कुणाची संमती आहे का?या वृक्षतोडीवर कोणाचा वरदहस्त तर नाही ना? या विषयाची देखील प्रशासकीय यंत्रेणेने गांर्भियाने लक्ष देऊन चौकशी करण्यात यावी व वनसंपत्तीचा होणारा विनाश थांबविण्यासाठी ही कार्यवाही होणे अत्यंत गरजेची असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांसह पर्यावरण व वृक्षप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.