भुसावळ-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
तालुक्यातील फुलगाव क्रिकेट क्लबतर्फे बस स्टॉप जोगेश्वरी माता मंदिराजवळ फुलगाव येथे आयोजित भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस १५५५५/-रु.तर द्वितीय बक्षीस ७७७७/-राहणार आहे.सदरील क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन दि.४ रोजी मोठ्या थाटात पार पडले.या स्पर्धेचे आयोजन गोलू चौधरी (मीठू भाऊ),तेजस चौधरी,हर्षल पाटील व लयभारी मित्र मंडळ फुलगाव यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
यानिमित्त आयोजित क्रिकेट स्पर्धा कार्यक्रमाचे उद्घाटन दि.४ रोजी युवा स्वाभिमान पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष तथा बहुजन टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष श्री.महेंद्रभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख पाहुणे म्हणून वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आशिष अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात वरणगाव पोलीस स्टेशन कर्तव्यदक्ष सीनियर पोलीस उपनिरीक्षक आशिष अडसूळ यांच्या हस्ते टॉस करून व चेंडू खेळून तसेच सर्व खेळणाऱ्या टीमला जिंकण्यासाठी शुभेच्छा देऊन करण्यात आली.त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील यांनी सदरील स्पर्धा हि खेळाडू भावनेतून खेळण्यात यावी असे खेळाडूंना आवाहन केले व खेळणाऱ्या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या.यावेळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करणाऱ्या गोलू चौधरी (मीठू भाऊ),तेजस चौधरी,हर्षल पाटील व लयभारी मित्र मंडळ फुलगाव यांनी उद्घाटक व प्रमुख पाहुणे युवा स्वाभिमान पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष तथा बहुजन टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष श्री.महेंद्रभाऊ पाटील,व वरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री.आशिष अडसूळ यांचे उपस्थितीबद्दल आभार मानले.